घरांच्या नावाखाली फसवणूक, १५०० कोटींचा घोटाळा उघड

नवी दिल्ली | ५ मे – हरियाणाचे काँग्रेसचे माजी आमदार धरमसिंग छोक्कर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीत अटक केली आहे. १५०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून, रियल इस्टेट घोटाळ्याशी संबंधित ही कारवाई आहे. छोक्कर यांच्यावर दीनदयाळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरांची फसवणूक, लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळणे, पण घरे न देणे आणि पैसेही परत न करणं – अशा स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी गुरुग्राममध्ये 'साई ऐना फार्म्स' या कंपनीमार्फत ही प्रकरणे हाताळल्याचे तपासात समोर आले आहे.
ईडीची प्राथमिक माहिती:
- १५०० हून अधिक घर खरेदीदारांची फसवणूक
- ४०० कोटींचा घोटाळा छोक्कर यांचे पुत्र
सिकंदर छोक्कर यांच्याविरोधात
- ईडीकडून आधीही घरांवर छापे आणि कागदपत्रे
जप्त
ईडीकडून आज न्यायालयात हजर करून छोक्कर यांची
कोठडी मागण्यात येणार असून, या चौकशीतून आर्थिक फसवणुकीच्या
व्यापक नेटवर्कचा तपास केला जाणार आहे. धर्मसिंग छोक्कर हे हरियाणाचे माजी
मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांचे जवळचे सहकारी मानले जातात.