अमरनाथ यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे चार यात्रेकरू वाहून गेले, अनेक जखमी

श्रीनगर (जम्मू-कश्मीर)काश्मीर खोऱ्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा गुरुवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. विशेषतः गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावरील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गुरुवारी दगड कोसळल्यामुळे एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, बुधवारी याच मार्गावर झालेल्या भूस्खलनात तीन भाविक जखमी झाले आहेत. आपत्तीनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या टीम्स घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या आणि मदतकार्य हाती घेतले. जम्मूतील पहिल्यांदाच यात्रा थांबवण्यात आली आहे. ३ जुलैपासून सुरू झालेली यात्रा, यावर्षी आतापर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी पूर्ण केली आहे. बालटाल मार्गावरील चिखलाच्या प्रवाहाचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामध्ये दोन भाविक प्रवाहात वाहून जाताना दिसतात, मात्र इतर यात्रेकरूंच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. काही भाविकांनी रेलिंगला घट्ट धरून स्वतःचा जीव वाचवला. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (BRO) बालटाल मार्गाची दुरुस्ती सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे दुरुस्ती कार्य पूर्ण होईपर्यंत यात्रा स्थगितच राहील.

ही यात्रा दोन मार्गांद्वारे पार पडते —

1.       नुनवान-पहलगाम मार्ग (48 किमी) – पारंपरिक आणि तुलनेने सुरक्षित

2.      बालटाल मार्ग (१४ किमी) – कमी अंतराचा, पण अधिक खडतर

,88० मीटर उंचीवरील अमरनाथ गुंफेत पोहोचण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी सहभागी होतात. यंदा यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्याने यावर्षी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सैन्य, निमलष्करी व पोलीस दलाच्या हजारो जवानांची तैनाती करण्यात आली आहे.