माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान

वॉशिंग्टन :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोटस्टेट कॅन्सर झाल्याचे त्यांच्या अलीकडील वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॅन्सर नवव्या टप्प्यात असून, कॅन्सरचे पेशी हाडांपर्यंत पसरले आहेत. या बातमीने अमेरिकन राजकारणासह जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. जो बायडेन यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी आरोग्य तपासणी केली होती. तपासणीत गंभीर कॅन्सरचे निदान झाले. या बातमीवर माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी शोक व्यक्त करत म्हणाले की, "राजकारण वेगळं असलं तरी बायडेन यांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो. या कठीण काळात माझ्या सदिच्छा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत." सध्या बायडेन यांच्यावर उपचार सुरू असून, वैद्यकीय तज्ञ त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना रुग्णालयात विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता बायडेन हे अमेरिका आणि जागतिक राजकारणातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आरोग्यसंकट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.