ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणात अडचणीत

पुणे | रुबी हॉल रुग्णालयातील किडनी
प्रत्यारोपण रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.
अजय तावरे अडचणीत आले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘विभागीय
मानवी अवयव प्राधिकार समितीने नऊ किडनी प्रत्यारोपणांना मंजुरी दिली, त्यातील काहींमध्ये बनावट व्यक्ती आणि कागदपत्रांचा वापर झाला. त्यामुळे तावरे यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून आर्थिक देवाणघेवाणीस मदत
केल्याचा आरोप आहे. कोठडीत असलेल्या तावरेला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले डॉ.
तावरे हे कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणातील रक्तनमुना बदल प्रकरणात वर्षभरापासून
येरवडा कारागृहात होते. किडनी रॅकेट प्रकरणात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे
शाखेने प्रॉडक्शन वॉरंटद्वारे त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. समितीने नियम झुगारले,
बनावट व्यक्तींना दिली परवानगी किडनी रुग्ण अमित साळुंखेच्या पत्नी
सुजाता ऐवजी सारिका सुतार मुलाखतीस हजर होती, आणि तिच्या
वयात विसंगती असूनही समितीने प्रत्यारोपणास परवानगी दिली. साक्षीदारांचे
उत्तर संदिग्ध आणि संशयास्पद असतानाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आर्थिक
व्यवहार झाल्याचा संशय आहे. डॉक्टर व रुग्णालय प्रशासन निर्दोष या प्रकरणात रुबी
हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. अभय सद्रे, डॉ. भूपत भाटी, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी
आदींनी कायदेशीर मार्गाने प्रत्यारोपण केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना
गुन्ह्याबद्दल दिशाभूल करण्यात आल्याने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले
नाही. एकूण १७ आरोपींवर गुन्हा दाखल आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम
यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात १७ आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल आहे. यामध्ये साळुंखे कुटुंबीय, दात्या सारिका
सुतार, बनावट कागदपत्र तयार करणारे एजंट, दिशाभूल करणारे सहाय्यक आणि डॉ. तावरे यांचा समावेश आहे. समितीच्या
भूमिकेवर गंभीर प्रश्न आरोग्य विभागाच्या चौकशीत समितीने ओळख पडताळणीसाठी कोणतीही
कागदपत्रे तपासली नाहीत, तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी न
करता बनावट कागदांवर अवयव प्रत्यारोपणास परवानगी दिली, हे
निष्पन्न झाले. या समितीचा अध्यक्ष म्हणून डॉ. अजय तावरे यांच्यावर मुख्य जबाबदारी
असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.