झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; वयाच्या ८१व्या वर्षी अखेरचा श्वास

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे आज दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. आदरणीय दिशोम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो आहे…
असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहित भावनांचा उद्रेक केला.  'दिशोम गुरुजी' या नावाने प्रसिद्ध असलेले शिबू सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली नेतृत्व होते. झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक, संरक्षक व तीन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले शिबू सोरेन हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते आणि उपचारासाठी दिल्लीतील रुग्णालयात दाखल होते.

राजकीय प्रवासाचा आढावा

  • शिबू सोरेन यांचे झारखंडच्या आदिवासी समाजावर प्रचंड प्रभाव होता.
  • त्यांनी आदिवासी हक्क आणि जंगल जमिनीच्या रक्षणासाठी लढे उभारले.
  • २००५, २००९ आणि २०१० मध्ये त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
  • त्यांच्या कारकिर्दीत झारखंड मुक्ती मोर्चाने अनेक राजकीय चढउतार पाहिले, परंतु त्यांनी पक्षाचे नेतृत्व कायम राखले.

शोकसंदेश आणि प्रतिक्रिया

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, एनडीए व विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
  • अनेकांनी त्यांना “झारखंडचा आत्माअसे संबोधले आहे.