जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. त्यांनी दुपारी १ वाजता नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून आजारी होते.

राज्यपाल म्हणून कार्यकाळ:

  • बिहार: २०१७
  • जम्मू-काश्मीर: ऑगस्ट 2018 – ऑक्टोबर २०१९
    • त्यांच्या कार्यकाळातच ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आले आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला.
  • गोवा: नंतर नियुक्ती
  • मेघालय: ऑक्टोबर २०२२ पर्यंत

सत्यपाल मलिक यांची राजकीय कारकीर्द:

  • उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील रहिवासी
  • १९६६-६७: मेरठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष
  • १९७४: बीकेडीच्या तिकिटावर बागपतमधून आमदार
  • 1980: लोकदलातून राज्यसभा सदस्य
  • 1983: काँग्रेसमधून राज्यसभेत
  • 1987: बोफोर्स घोटाळ्यानंतर राजीनामा, नंतर जनमोर्चा आणि जनता दलात
  • 1989: जनता दलाच्या तिकिटावर अलिगढमधून खासदार
  • २००४: भाजपमध्ये प्रवेश
  • २०१७ पासून विविध राज्यांचे राज्यपाल

ठळक वैशिष्ट्ये:

  • राजकारणातील विविध पक्षांमधून प्रवास
  • कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार
  • भाजपच्या निवडणूक रणनीतीत भूमिका