कोकेनच्या गोळ्या शरीरात लपवून भारतात प्रवेश; मुंबई विमानतळावर परदेशी प्रवासी अटकेत

मुंबई :- ७.८५ कोटी रुपये किंमतीचा कोकेनचा साठा
शरीरात लपवून भारतात आलेल्या एका परदेशी प्रवाशाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर
कस्टम विभागाने अटक केली आहे. या प्रवाशाच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले असून, संबंधित प्रवासी युगांडा एअरलाईन्सच्या
फ्लाइटमधून मुंबईत दाखल झाला होता.
शक्यतेंमुळे एक्स-रे तपासणी; पोटात लपवलेल्या कॅप्सूल्समधून कोकेन
सापडलं
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी
दिलेल्या माहितीनुसार:
- १०
एप्रिलच्या मध्यरात्री प्रवासी मुंबई विमानतळावर उतरला.
- त्याच्या
हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले.
- सामान
तपासूनही काही मिळाले नाही,
मात्र प्रवासी अस्वस्थ वाटल्याने त्याचा एक्स-रे करण्यात आला.
- पोटात
असंख्य कॅप्सूल्स आढळून आल्या,
चौकशीत त्याने त्या कोकेनच्या असल्याचे मान्य केले.
- १३
एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात या कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या.
- चाचणी
अंती त्यातली शुभ्र भुकटी कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय
स्तरावर होणाऱ्या ड्रग्स तस्करीचे एक गंभीर प्रकरण उघड झाले आहे.