पंजाबमधील पूरस्थिती अजूनही गंभीर; मृतांचा आकडा ५१ वर, १५ जिल्ह्यांतील लाखो लोक प्रभावित

पंजाबमध्ये पुराची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. राज्यात सध्या पाऊस
नसला तरी, गेल्या
काही दिवसांच्या पुरामुळे झालेलं नुकसान प्रचंड आहे. मानसा, मोगा आणि पटियाला जिल्ह्यात आणखी ३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे.
पूरामुळे १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले
आहेत. तर १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
पंजाब
सरकारची मदत
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंजाब मंत्रिमंडळाने मोठा दिलासा दिला आहे.
सरकारने प्रति एकर २०,००० रुपये भरपाई जाहीर केली आहे. त्यासोबतच ‘जिसदा खेत, उसकी रेत’ योजना मंजूर करण्यात आली आहे.
याअंतर्गत शेतकरी पुरानंतर शेतात साचलेली वाळू काढून विकू शकतील, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल.
धरणातील
पाण्याची स्थिती
- बियास नदीवरील पोंग धरणाची पातळी १,३९०.७४ फूट झाली आहे (मागील दिवशी १,३९२.२० फूट).
- धरणातील पाण्याचा प्रवाह ३६,९६८ क्युसेकवरून कमी होऊन ३४,५८० क्युसेक झाला आहे.
- भाक्रा धरणातील पाणीपातळी १,६७७.२ फूट झाली आहे.
नुकसानीचं
मूल्यमापन सुरू
महसूल मंत्री हरदीप सिंग मुंडियां यांनी सांगितलं की, आतापर्यंत जवळपास १.८५ लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत.
घरं आणि पशुधनाच्या नुकसानीचं मूल्यांकन सुरू आहे. पाणी ओसरल्यानंतर पूर्ण अहवाल
जाहीर होईल.
दरम्यान, पठाणकोट जिल्ह्यात अजूनही ३ लोक बेपत्ता असल्याचं
प्रशासनाने सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या मते, या पुराचा
परिणाम केवळ शेतीवरच नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन स्वरूपात होणार
आहे.