जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 व्या समारंभ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, अन्नधान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.