वृद्ध महिलेच्या पोटातून काढली पाच किलोची गाठ

सोलापूर – सोलापूर शहरातील सैफुल येथे असलेल्या आधार क्रिटिकल केयर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया द्वारे एका वयोवृद्ध महिलेच्या पोटातून साडेपाच किलो रक्ताची गाठ काढून वयोवृद्ध महिलेचे प्राण वाचवले आहे. सत्यभामा गायकवाड वय 85 रा. सैफुल विजापूर रोड सोलापूर असे प्राण वाचविलेल्या महिलेचे नाव आहे. या शस्त्रक्रियामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत. सोलापूर शहरातील सैफुल विजापूर रोड येथे राहणारे 85 वर्षीय वयोवृत्त महिला सत्यभामा गायकवाड यांना पोट दुखीचा त्रास होत होता. अनेक दिवसांपासून सत्यभामा गायकवाड यांनी हा त्रास सुरू होता. वेदना सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर त्यांना सोलापूर शहरातील आधार क्रिटिकल केयर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.सत्यभामा गायकवाड यांच्या पोटाच्या सिटी स्कॅन मध्ये गाठ दिसली होती. डॉक्टर करमजीत डोंगरे गायनॅकॉलॉजिस्ट आणि डॉ. योगेश राठोड यांनी तब्बल तीन ते चार तास शस्त्रक्रिया करून त्या महिलेच्या पोटातून रक्ताची गाठ काढली आणि त्या वयोवृद्ध महिला सत्यभामा गायकवाड यांचे प्राण वाचवले. महिलांच्या शरीरात होणाऱ्या काही बदलांमुळे गाठ निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखणे, अपचन होणे तसेच नैसर्गिक क्रिया करताना अडचणी येऊ शकतात. तर कधी कधी ही गाठ कॅन्सरची देखील असू शकते. वरील काही लक्षणे दिसून आल्यास तपासणी करून घेऊन उपचार करावे असा सल्ला डॉ. योगेश राठोड यांनी दिला आहे. डॉक्टरांनी केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे वयोवृद्ध आजी सत्यभामा गायकवाड यांना नवीन जीवन मिळाले आहे, तर नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे.