फटाक्यांची आतिषबाजी प्रेक्षकांच्या जीवावर

त्रिवेंद्रम: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एक भायनक घटना घडली. फुटबॉल
सामन्याआधी आयोजकांनी फटाके फोडले, हे फटाके हजारो प्रेक्षकांमध्ये उडाले
आणि जवळपास ३० लोक जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
जखमींमध्ये बहुतांश मुले असून दोन प्रेक्षकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात
येत आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात
फुटबॉलचा अंतिम सामना पाहाण्यासाठी होण्यासाठी हजारो लोक जमले होते. युनायटेड एफसी
नेल्लीकुथू आणि केएनजी मावूर यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी आयोजकांनी मैदानाच्या
मध्यभागी फटाके फोडले. फोडलेले फटाके प्रेक्षकांमध्ये उडाले, हे फटाके इतके हाणिकारक ठरले की फटक्यांच्या आगीमुळे जवळपास ३० प्रेक्षक
जखमी झाले. जखमींना आरेकोडे येथील दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फुटबॉल स्पर्धा समितीने जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले.