अक्कलकोट रोडवरील सेंट्रल इंडस्ट्री कारखान्यात आग
.jpeg)
सोलापूर – अक्कलकोट रोडवरील MIDC परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या टॉवेल तयार करणाऱ्या कारखान्यात मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारखान्यात आणखी 5 ते 6 जण अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहेत. टॉवेलचे साहित्य ज्वलनशील असल्याने आग अधिक वेगाने पसरली. संपूर्ण परिसर ज्वाळांनी वेढले गेले होते.
पोलिसांकडून घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.