सदाशिवनगर ग्रामपंचायत आणि पुरंदावडे सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

सदाशिवनगर ग्रामपंचायतच्या नूतन
उपसरपंचपदी श्री. विष्णू भोंगळे सर तर पुरंदावडे विकास सेवा सोसायटीच्या नूतन
चेअरमनपदी श्री. वसंत ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निमित्ताने
लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते दोन्ही नव्या
पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात
आल्या. यावेळी उपसभापती मा. श्री.
अर्जुनसिंह मोहिते पाटील, बाबासाहेब माने पाटील तसेच इतर
मान्यवर उपस्थित होते. या निवडीमुळे ग्रामविकासाच्या कार्याला अधिक बळ मिळणार
असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.