सोलापूर | दि. ९ मार्च (प्रतिनिधी):
श्री साई महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महिला महोत्सव २०२५ अंतर्गत २ मार्च ते ४ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ ९ मार्च रोजी इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
समारंभाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले, ज्यासाठी प्रा. ए. डी. जोशी सर, अमोल जोशी सर, प्रतिष्ठानच्या सचिव सौ. सायली जोशी आणि प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना सायली जोशी मॅडम यांनी केली.
महिला महोत्सवाचे हे १५ वे वर्ष होते. यामध्ये 'Mom & Me', 'Solo Dance' आणि 'Group Dance' यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. १६ ते ७० वयोगटातील १००० पेक्षा अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विजेत्यांमध्ये -
- प्रियांका चडचणकर (Mom & Me),
- भक्ती राहुल कुलकर्णी(Solo Dance – गट अ),
- आरती अमोल यादव(Solo Dance – गट ब),
- हिरकणी ग्रुप(Group Dance) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले -
- छावा चित्रपटातील रायाजीची भूमिका साकारलेले अभिनेता संतोष जुवेकर,
- त्यांची घेतलेली विशेष मुलाखत दै. संचारचे उपसंपादक श्री. प्रशांत जोशी यांनी केली.
- उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना जुवेकर यांनी दिलखुलास उत्तरं दिली.
- ‘यक्षगान’ या कर्नाटकी पारंपरिक नृत्याचे सादरीकरण
- इंडियन मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळा, याला विशेष प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती – अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव आणि सौ. दिपाली जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायली जोशी, ईशा जोशी, ममता बसवंती, अपर्णा कुलकर्णी, व श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा जोश, प्रतिभा आणि कला साजरी करत 'महिला महोत्सव २०२५' एक संस्मरणीय पर्व ठरले.