बीडमध्ये मशिदीत दोन स्फोट; आरोपींना अटक;

बीड: बीडमधील गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील मशिदीत स्फोट झाला आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मशिदीचे नुकसान झाले आहे. 

या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्फोटामुळे मशिदीत सहा इंचाचा खड्डा पडला आहे

स्फोटानंतर तलवाडा पोलिस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी अधिकचा फौजफाटा तैनात केला आहे. या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही तरुण 22 वर्षांचे आहेत.

बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रात्री 2.30 वाजता हा स्फोट झाला. दोन तरुणांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला. त्यामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले आहेत. तसेच मशिदीतील फरश्याही फुटल्या आहेत. या स्फोटाचा आवाज आल्याने गावातील लोक खडबडून जागी झाले. मशिदीत स्फोट झाल्याचे कळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

आरोपींचा व्हिडीओ व्हायरल– बीड मध्ये आरोपींनी स्फोट करण्यापूर्वी जिलेटीन सोबत केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अर्धमसला येथील स्फोटा प्रकरणात विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांचे व्हिडिओ समोर आले आहे. स्फोटामुळे मशिदीच्या भीतींना तडे गेली आहेत. खिडक्यांची काचेही फुटली आहे.