चेंगरा चेंगरीतून सावरण्यापूर्वीच कुंभमेळ्यात आगीचे तांडव

प्रयागराज
: बुधवारी
पहाटे झालेल्या चेंगराचींगरीच्या भीषण घटनेतून सावरण्यापूर्वीच कुंभमेळ्यात
गुरुवारी दुपारी आगीचे तांडव सुरू झाले आहे. कुंभमेळा परिसरातील सेक्टर 22 मध्ये
लागलेल्या भीषण आगीत 18 तंबू भस्मसात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 19
जानेवारी रोजी लागलेल्या आगीत 100 हून अधिक तंबू भस्मसात झाल्या होत्या. गॅस
सिलेंडर स्फोटाने ही आग लागल्याचे नंतर स्पष्ट झाले. परंतु, आज गुरुवारी दुपारी लागलेल्या आईचे
कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान,चेंगराचेंगरी नंतर परिस्थिती पूर्ण
नियंत्रणात आली असून जगभरातून आलेले भक्त आणि विविध आखाड्यांचे महाराज यांचे स्नान
व पूजा नियमितपणे सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. प्रशासनाकडूनही
भाविकांना सूचना आणि माहिती वेळोवेळी ध्वनी प्रक्षेपकावरून दिली जात आहे.