समाजवादी पक्षाची आणखी एका राज्यात एन्ट्री

देशात २०२४ हे निवडणुकींचे वर्ष ठरले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकींची तयारी काही पक्षांनी सुरु केली आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेश, गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता समाजवादी पक्षाने गोव्यात एन्ट्री घेतली आहे. अखिलेश यादव यांचे विश्वासू मनीष अग्रवाल यांना 'सपा'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी बनवले आहे. समाजवादी पक्षाची आता राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या निवडीमुळे अखिलेश यादव यांनी एक मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे, सपाच्या गोव्यातील एन्ट्रीने गोव्यातील काँग्रेसला धोका निर्माण होऊ शकतो.

गोव्यात आम आदमी पक्षाचे दोन आमदार आहेत, तर काँग्रेस आणि भाजप या पक्षांची नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर सत्तेत आहेत. राज्य मुंबईनंतर वेगाने विकसित होणार राज्य आहे. गोव्यात आर्थिक घडामोडी वेगाने वाढत आहेत आणि मनीष जगन अग्रवाल यांचे बिझनेस असेंब्लीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सपासाठी हे नवी इनिंग नक्कीच फायदेशीर ठरू शकते. गोव्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. या छोट्या राज्यात अनेक पक्ष आपले नशीब आजमावत आहेत. आम आदमी पार्टी त्यानंतर तृणमूल काँग्रेसने गोव्यात आल्यानंतर अखिलेश यादव यांनीदेखील गोव्यात आपला कमांडर उतरवला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत सपा आपले नशीब आजमवणार आहे. वात पक्षाला किती यश मिळेल, हे वेळच सांगू शकेल. दरम्यान, समाजवादी पक्षाची गोव्यात एन्ट्री झाल्याने राज्यातील सत्ताधारी पक्षाचे टेन्शन वाढवणार आहे. तसेच राज्यात इंडिया आघाडीत सपा सहभागी झाल्यास आघाडीतील पक्षांचे देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेतील ४० जागांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील बदलण्याची शक्यता आहे. आता पुढे काय होते हे येणारी वेळच ठरवेल.