संपूर्ण शेअर बाजार रेड झोनमध्ये

मुंबई, दि. २०-

शेअर बाजारातील घसरण शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, आणखी तीव्र झाली. यूएस फेडरलसह जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे बाजाराला नजर लागली आणि शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले आहेत. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले असून या संपूर्ण आठवडाभर शेअर बाजार लालेलाल झाला होता. शेअर बाजाराबरोबरच भारतीय चलनही आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर घसरले.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या घसरणीसह व्यवसाय लाल रंगात बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ११७६ अंकांच्या

SEPFUT

5-8

150

KOTB195

000

घसरणीसह ७८,०४१.५९ वर क्लोज झाला तर एनएसई निफ्टी १.३८ टक्के घसरून २३,६२१.८५ वर स्थिरावला. आजच्या व्यवहार दरम्यान डॉ. रेड्डीज लॅब्स, अपोलो हॉस्पिटल्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि टायटन कंपनीचे शेअर्स टॉप गेनर्सच्या ठरले तर याउलट टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, टीसीएस, इंडसइंड बँक, एमअँडएम यांचे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर

सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते.

दिवसभरात रिअल्टी निर्देशांकात ४ टक्के मोठी घसरण झाली असून ऑटो. आयटी. कॅपिटल गुड्स, मेटल, टेलिकॉम, पीएसयू बैंक निर्देशांक २ टक्के घसरणीसह क्लोज झाले. एकूणच सर्वच क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात स्थिरावले असून बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही दोन टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाले. मागील सत्रात यूएस फेडने २५ बेसिस पॉइंट रेट कपात जाहीर केल्यानंतर निफ्टी आणि बीएसई दोन्ही सेन्सेक्स १टक्का घसरले पण २०२५ मध्ये केवळ दोनच दर कपातीचा अंदाज वर्तवला, ज्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि बाजारातील विक्रीचा वेगही वाढला.