रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर - राज्याचे  रोजगार हमी योजना,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.  यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते  रोजगार हमी योजना मंत्री श्री गोगावले  यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.  यावेळी आमदार राजू खरे, माजी     आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके   यांच्यासह  मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.