गाझामधील बाप-लेकीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल; पार्ले-जीसाठी मोजले 2350 रुपये!

गाझा – युद्धाच्या संकटात सापडलेल्या गाझामधून एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. एका पित्याने आपल्या लहान मुलीसाठी भारतात ५
रुपयांना मिळणारे पार्ले-जी बिस्किटाचे पाकीट तब्बल २३५० रुपयांना विकत घेतल्याची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गाझामधील मोहम्मद जवाद यांनी आपल्या मुलगी रविफसाठी ही अतिशय महागडी खरेदी केली आणि
तिचा आनंद टिपत एक पोस्ट शेअर केली. बिस्किटाचे भाव गगनाला भिडले पार्ले-जी हे भारतातील सर्वसामान्य कुटुंबासाठी सहज
परवडणारे बिस्किट. मात्र गाझामध्ये युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्नटंचाईमुळे
त्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. एकेकाळी १.५ युरोला मिळणारे पार्ले-जीचे पॅक
आता २४ युरो (२३५० रुपये) देऊन घ्यावे लागत आहेत. मोहम्मद
जवाद यांनी लिहिलं, “मी रविफला तिचं आवडतं बिस्किट
नाकारू शकलो नाही. किंमत काहीही असो!” अन्नधान्याची टंचाई, नागरिकांची होरपळ गाझामध्ये इस्रायलने सर्व पुरवठा मार्ग बंद केल्यामुळे अन्नधान्य, औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंची
प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे.
- १
किलो साखर – ₹4914
- १
किलो बटाटा – ₹1965
इतके पैसे मोजूनही लोकांना अत्यावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हमास-इस्रायल संघर्षामुळे ही परिस्थिती भीषण होत चालली आहे. व्हिडिओने मन हेलावलं मोहम्मद जवाद यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर लाखो लोकांचे लक्ष वेधले. युद्ध, अन्नटंचाई आणि महागाईने जगण्याचा लढा देणाऱ्या एका पित्याची मुलीवरची माया आणि त्यासाठीची तडजोड पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.