जिल्ह्यात धावतात अकरा लाख वाहने
.jpeg)
सोलापूर, दि. ११- गत काही वर्षांपासून महागाई वाढली असली तरी धकाधकीच्या जीवनात वाहन हे गरजेचे झाले आहे. त्यामुळे उद्योगपतींसह नोकरदार मंडळी आपापल्या ऐपतीप्रमाणे वाहने खरेदी करू लागली असून सोलापूर जिल्ह्यात १० लाख १६ हजार दुचाकी तर एक लाख पाच हजार चारचाकी वाहने धावत आहेत. यासाठी वाहने चालवताना कायद्याचे व नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
गत अकरा महिन्यांत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहेत. कंपनीकडून वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करणे गरजेचे आहे. तसेच वाहनांची कागदपत्रे कार्यालयात सादर करून आपला वाहन चालवण्याचा परवाना वैध आहे का, हे पाहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. जर वाहन चालविण्याच्या परवान्याची
(लायसेन्स) मुदत संपली असेल तर तो नव्याने नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे.
शहरासह जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक दररोज वाहनांची तपासणी करत असून अशावेळी आपल्याकडे आढळून आली नाही तर दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय नेहमी वाहन तपासणी मोहीम घेते. त्यावेळेस दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांनी मोहीमला वाहन निरीक्षकांना तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन आरटीओंनी केले आहे. महागाई असली तरी जास्त किंमत असलेल्या दुचाकीला तरूणांची पसंती दिसत आहे.
अशावेळी नियमानुसार वाहने चालवणे गरजेचे आहे. वाहना चालविण्याचा परवाना सोबत ठेवणे गरजेचे आहे. वाहन कोणतेही असले तरी कर भरणे आवश्यक आहे. तसेच परदेशी किंवा देशी वाहन असले तरी कर (टॅक्स) भरणे आवश्यक आहे. कराच्या बाबतीत कोणालाही सूट देण्यात येत नाही.. वाहन चालविण्याचा परवाना सर्वांनी काढून घेतला पाहिजे, असे आरटीओ कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.
नियमांचे पालन करणेही आवश्यक
रस्त्याने वाहन चालवताना नियमांचे पालन करणे, लायसन्स जवळ ठेवावे, सीटबेल्ट वापरावा, हेल्मेट वापरावे, लायसन्सची मुदत संपली असेल तर आरटीओ कार्यालयात लायसन्स दाखल करून नूतनीकरण करून घेणे तितकेच गरजेचे आहे.