राज्यात वीज दरात २६% टप्प्याटप्प्याने कपात, परंतु काहींना प्रतीक्षा

मुंबई :
राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. १ जुलैपासून वीज दरात टप्प्याटप्प्याने सुमारे २६ टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार आहे. तसेच स्मार्ट मीटर (Time of Day - TOD) वापरणाऱ्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरावर १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. मात्र, ही सवलत जुन्या मीटर धारकांना अद्याप मिळणार नाही.

नवीन दरानुसार,

  • १ ते १०० युनिट वापरणाऱ्यांना प्रतियुनिट दर ६.३२ रुपयांवरून ५.७४ रुपये होणार आहे.
  • १०१ ते ३०० युनिट वापरणाऱ्यांसाठी दर १२.२३ वरून १२.५७ रुपये होणार आहे.
  • ३०१ ते ५०० युनिट वापरणाऱ्यांना प्रतियुनिट १६.७७ ऐवजी १६.85 रुपये आकारले जातील.
  • ५०० युनिटपेक्षा जास्त वापर करणाऱ्यांना मात्र प्रतियुनिट दर १९ रुपये होईल, ज्यात तात्काळ कोणतीही कपात नाही.

दुसरीकडे, स्मार्ट मीटरबद्दल नागरिकांत मोठा विरोध आहे. अनेक ठिकाणी या मीटरच्या बसवणीस नागरिकांचा कडाडून विरोध होत असला तरी, २६ हजारांपेक्षा जास्त स्मार्ट मीटर आधीच बसवण्यात आले आहेत. महावितरणने स्पष्ट केले आहे की, स्मार्ट मीटरमुळे बिल वाढत असल्याच्या तक्रारी निराधार आहेत आणि हे मीटर जुन्या मीटरसारख्याच युनिटची नोंद करतात.

स्मार्ट मीटरधारकांना पुढील पाच वर्षांत प्रतियुनिट अतिरिक्त सूट टप्प्याटप्प्याने मिळणार आहे:

  • २०२५-२६ मध्ये 80 पैसे,
  • २०२६-२७ मध्ये 85 पैसे,
  • 2027-28 मध्ये ९० पैसे,
  • २०28-२९ मध्ये ९५ पैसे,
  • २०२९-३० मध्ये १ रुपया प्रतियुनिट सवलत.

दरम्यान, या सवलती केवळ स्मार्ट मीटर वापरकर्त्यांना लागू असतील, त्यामुळे सामान्य ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.