दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड

नवी दिल्ली. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अखेर रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही येता निवडीसाठी विलंब झाला होता. निकालास दोन आठवडे उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत नाव निश्चित होत नव्हते. या पार्श्वभूमीवर रेखा गुप्ता यांनी बाजी मारली आहे रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच भाजपा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाने हा प्रस्ताव स्वीकारला आहे.  रेखा गुप्ता यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाची शपथविधी उद्या गुरुवारी दुपार होण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर सदस्या बाबत अद्याप ठोस माहिती नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रेखा गुप्ता या आक्रमक विद्यार्थी नेत्या म्हणून परिचित आहेत. दिल्ली विद्यापीठात आणि भाजपाच्या विद्यार्थी चळवळीमध्ये त्या सक्रिय होत्या.