रायगडमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रायगड : राजधानी नवी दिल्ली आणि बिहार पाठोपाठ आता
रायगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री रायगड
जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले. अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या, हादरू
लागल्या होत्या, त्यामुळे
नागरिक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता सौम्य असली तर नागरिकांमध्ये
भीतीचे वातावरण होते. दोन
दिवसांपूर्वी नवीदिल्ली आणि बिहारच्या पाटणा जिल्ह्यात 4 अंश तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या पार्श्वभूमिवर आता
दक्षिण भारातातही धरणीकंप जाणवल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड
जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेण तालुक्यातील तिलोरे, वरवणे आणि सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ
वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे हादरले जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वत:चा
जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणार्या तिलोर व
महागाव परिसरात काल रात्रीपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास पहिला धक्का जाणवला, त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांचे
म्हणणे आहे.