गौडगाव मारुती मंदिरात दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम

अक्कलकोट, दि. ११- दत्त जयंतीनिमित्त गौडगाव बुद्रुक येथील दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १०१ दीप प्रज्वलित केले जाणार आहेत.

१४ डिसेंबर रोजी दत्त जयंती तर सायंकाळी चारनंतर पौर्णिमा सुरू होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या निमित्ताने मारुतीस महारूद्राभिषेक, अभिषेक, नवग्रह पूजा, शनिपूजा व होमहवन होणार आहे. १३ डिसेंबर रोजी मारुती मंदिरात सायंकाळी सहा ते रात्री दोनपर्यंत भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केले असून १४ रोजी श्री दत्तात्रयास अभिषेक व आरती केली जाणार आहे. त्यानंतर मारुतीस महारूद्राभिषेक, नवग्रह पूजा, शनिपूजा, होमहवन व यज्ञ होणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर समितीच्यावतीने हनुमान चालिसा देण्यात येणार आहे. दुपारी बाराच्या महाआरतीचा मान प्रथम रांगेत उभे असणाऱ्या भक्तांना मिळणार आहे. मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना शत्रुघ्न फावडे, शिशिर फावडे (रा. पुणे) व प्रवीणकुमार प्रकाश मेंथे यांच्याकडून श्री मारुती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत खानाप्रे यांनी दिली.

सोलापूरच्या दत्त जयंतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी dailysanchar.in ला फाॅलो करा.