मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड; जेजुरीच्या खंडोबा देवस्थानातही नियम लागू

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा
मंदिराच्या दर्शनासाठी नव्या ड्रेसकोडची अंमलबजावणी करण्यात आली आहे. श्री मार्तंड
देव संस्थानने सोमवारी (11 मार्च) पासून हा नियम लागू केला
आहे.
भारतीय वेशभूषेचा आग्रह, पाश्चिमात्य कपड्यांना मनाई
खंडोबा मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय
पारंपरिक पोशाख परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाश्चिमात्य कपड्यांवर सक्त
बंदी घालण्यात आली असून, योग्य वेशभूषा
नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारला जाईल, असे श्री मार्तंड देव
संस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
ड्रेसकोडमध्ये काय असेल?
- पुरुष:
धोतर,
कुर्ता, पायजमा किंवा पारंपरिक पोशाख
- महिला:
साडी,
सलवार-कुर्ता, चोळी-लुगडे किंवा पारंपरिक
ड्रेस
- पाश्चिमात्य
पेहराव जसे जीन्स,
टी-शर्ट, स्कर्ट, शॉर्ट्स
यांना बंदी
मंदिर प्रशासनाचा निर्णय का?
श्री मार्तंड देव संस्थानने हा
निर्णय मंदिराच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक शुचिर्भूततेसाठी घेतला असल्याचे स्पष्ट
केले आहे. भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि धार्मिक ठिकाणांच्या सातत्यपूर्ण
शिस्तीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्य मंदिरांमध्येही
ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता सध्या तिरुपती, पद्मनाभस्वामी,
वैष्णोदेवी, सोमनाथ आणि शिर्डीच्या साईबाबा
मंदिरातही विशिष्ट ड्रेसकोड पाळला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर
मंदिरांमध्येही असे नियम लागू होतील का, याकडे लक्ष लागले
आहे.