डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: मनीषा मानेची नव्या तपासाची मागणी

सोलापूर :- प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेल्या मनीषा माने-मुसळे हिने तिच्याविरुद्ध नव्याने आलेल्या आर्थिक अपहाराच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलिसांकडे नवीन मागणी केली आहे. मनीषा मानेने पोलिसांना दिलेल्या १६ जुलैच्या पत्रात, वळसंगकर हॉस्पिटल व संबंधित डॉक्टरांच्या – डॉ. शिरीष, डॉ. अश्विन, डॉ. उमा, डॉ. शोनाली – यांचे गेल्या तीन वर्षांचे बँक खाते तपासण्यासाठी स्वतंत्र ऑडिटर नेमावा, अशी मागणी केली आहे.
“माझ्या खात्याची चौकशी झाली, पण हॉस्पिटलची नाही”
पत्रात मनीषा म्हणते, “माझ्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी झाली आहे. मात्र, वळसंगकर हॉस्पिटल किंवा अन्य डॉक्टरांच्या खात्यांची चौकशी दोषारोपपत्रात
दिसून येत नाही.” तिने या तपासासाठी हॉस्पिटलमध्ये वापरण्यात
येणारे लाइफलाइन मनोरमा सॉफ्टवेअर, दैनंदिन IPD फायली, आणि संबंधित बँक खाती या सर्व गोष्टी एकत्रित स्वतंत्र ऑडिटरमार्फत ऑडिट करण्यात याव्यात, अशी विनंती केली आहे.
पोलिस कोठडीत ‘अनअकाउंट रकमे’ची चौकशी
१९ एप्रिल रोजी अटकेनंतर, मनीषाला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या काळात तिच्या
खात्यातील अनअकाउंट रकमेबद्दल पोलिस चौकशी झाली.
त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. मनीषा म्हणते की, “जर हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या खात्यांची चौकशी झाली, तर वस्तुस्थिती समोर येईल.”
सेवासमाप्तीच्या पत्रात कोणताही ठपका नाही –
मनीषा
मनीषाने आणखी एक मुद्दा उपस्थित केला की, २९ एप्रिल रोजी डॉ. वळसंगकर यांनी सेवासमाप्तीचे पत्र तिच्या पत्त्यावर पाठवले
होते. या पत्रात कुठलाही आर्थिक अपहार किंवा आरोप
नसल्याचे नमूद होते. “जामीन अर्ज नाकारण्यासाठी सूडबुद्धीने माझ्यावर
खोटे गुन्हे लावले जात आहेत,” असा आरोप मनीषाने केला आहे.