भारताच्या महिला व पुरुष संघाचा डबल धमाका

नवी दिल्ली :- पहिलाच खो-खो विश्वचषक भारतात खेळवला गेला आणि महिला-पुरुष दोन्ही संघांमध्ये भारताच्या संघाने इतिहास घडवला आहे. महिला खो-खो संघानंतर पुरूष खो-खो संघानेही नेपाळला नमवत विश्वचषक जिंकला. भारतीय संघ अशारितीने खो खो वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. महिला खो-खो संघाने नेपाळचा ७८-४० च्या फरकाने पराभव केला, तर पुरूष संघाने नेपाळचा ५४-३६ च्या फरकाने सामना जिंकला. भारतीय पुरुष संघाची संपूर्ण स्पर्धेत अपराजित होता आणि भारताच्या पुरूष संघाने अंतिम नवी दिल्ली: सोलापूर जिल्हा खो-खो संघाकडून खेळणारा वेळापूर येथील रामजी कश्यप याने नेपाळ विरुध्दच्या अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. फेरीवही विजय मिळवला. टीम इंडियाने नेपाळविरुध्दचा सामना ५४-३६ अशा फरकाने जिंकला, नेपाळच्या पुरूष संघाने भारताला चांगलीच टक्कर दिली. पण अखेरीस भारताने बाजी मारली. पान ७ वर राज्यातील खेळाडूंना महाराष्ट्र सरकारतर्फे सव्वा दोन कोटी सुवर्णपदक मिळविलेल्या भारतील खो-खो संघातील प्रत्येक खेळाडूला राज्य सरकारच्यावतीने दोन कोटी २५ लाखांचे घसघशीत बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी दिली. राज्यातील या यशस्वी खेळाडूंना थेट क्लासवन अधिकारी म्हणून नोकरी देण्यात येणार आहे.

पंतप्रधानांकडून दोन्ही संघाचे कौतुक

भारताच्या पुरुष व महिला खो-खो संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले आहे. भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक खेळाला या यशामुळे गौरवाचे स्थान मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धाराशिव जिल्हा संघातील अश्विनी शिंदे मोहोळची

मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील अश्विनी शिंदे हिने चमकदार कामगिरी करत बांगलादेशविरुध्दच्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला, आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये शिंदे हिने चमकदार कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. शिंदे सध्या धाराशिव जिल्हा खो-खो संघाकडून गेली ४ ते ५ वर्षांपासून खेळत असल्याचे सोलापूरचे शिवछत्रपती पुरस्कारविजेते खो-खो संघटक श्रीकांत ढेपे यांनी सांगितले.