ट्रम्प आज महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार; जागतिक आर्थिक महायुद्धाचा धोका?

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज दुपारी १२ वाजता एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत. जागतिक स्तरावर ताणलेले व्यापार संबंध आणि संरक्षणवादी धोरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय येत असल्यामुळे, आर्थिक विश्लेषकांकडून संभाव्य जागतिक आर्थिक महायुद्धाचा इशारा दिला जात आहे. ट्रम्प यांच्या 'America First' धोरणामुळे आधीच अनेक देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यांच्या धोरणांतर्गत आयात-निर्यातीवर नवीन टॅरिफ्स लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. विशेषतः चीन, युरोपियन युनियन आणि कॅनडा यासारख्या देशांशी असलेले आर्थिक संबंध अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे. जागतिक शेअर बाजारावरही याचा त्वरित परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.