Donald Trump चा नवा दावा : "भारत-पाकिस्तान युद्ध आम्ही थांबवलं, 5 लढाऊ विमाने पाडली गेली होती" — ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

वॉशिंग्टन :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचे श्रेय पुन्हा एकदा स्वतःकडे घेतले आहे. ‘हे कोणतेही सामान्य युद्ध नव्हते. दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न होते. विमाने पाडली जात होती. मी हस्तक्षेप केला आणि युद्ध थांबवले’, असा थेट दावा ट्रम्प यांनी केला आहे.

"पाच लढाऊ विमाने पाडली गेली होती!"

ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांच्यात परिस्थिती खूपच गंभीर होती. अंदाजे पाच लढाऊ विमाने पाडली गेली होती. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते.” मात्र, ही विमाने कोणत्या देशाची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

"फोन करून युद्ध थांबवलं" – ट्रम्प यांचा दावा

हे पहिलेचवेळ नाही की ट्रम्प यांनी असं विधान केलं. त्यांनी यापूर्वीही म्हटलं होतं की, मी मोदींना फोन करून सांगितलं – जर तुम्ही युद्ध केलंत, तर आम्ही व्यापार करार करणार नाही. मग दोन्ही देश शांत झाले. आम्ही युद्ध थांबवलं.”

त्यांनी असेही म्हटले की, व्यापाराला हत्यार बनवून त्यांनी हे संकट टाळले.

ऑपरेशन सिंदूर: युद्धसदृश परिस्थितीचा प्रारंभ

या पार्श्वभूमीवर, भारताने ६-७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PAK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. भारताने ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता.

या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले होते. अखेर १० मे रोजी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली.