जिल्हा वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यासह दोन जण लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात

विजयपूर : जिल्हा वक्फ बोर्डाचे लेखा परीक्षक मोहम्मद मोहसीन जमखंडी आणि त्याचा भाऊ मुजाहिद जमखंडी हे लाच घेताना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात लोकायुक्तांनी लावलेल्या सापळ्यात रंगेहाथ पकडले जिल्हा वक्फ बोर्डाचे लेखा परीक्षक मोहम्मद मोहसीन जमखंडी यांनी अंजुमन इस्लाम समितीच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. दीड लाखाची लाचेची रक्कम स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात छापा टाकून जिल्हा वक्फ बोर्डाचे लेखा परीक्षक महंमद मोहसीन जमखंडी व त्याचा भाऊ मुजाहिद जमखंडी यांना अटक करून पुढील तपास केला. लोकायुक्त एसपी टी. मल्लेश, पोलिस निरीक्षक आनंद टक्कनवर, आनंद डोणी आणि लोकायुक्त पोलिस ठाण्याचे कर्मचारी या छाप्यात सहभागी झाले होते.