जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा यशस्वी! राहुल तिवाडी व आनंद मुसळे पुरुष दुहेरीमध्ये सलग पाचव्यांदा अजिंक्य
.jpeg)
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने सुयश गुरुकुल येथील आत्मन क्रीडा संकुल, सोलापूर येथे दिनांक 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला सोलापूर शहरासह पंढरपूर, बार्शी, अकलूज, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यांतून एकूण 364 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये तीन दिवसांत 340 सामने खेळविण्यात आले. स्पर्धेचे सर्व सामने यशस्वीरित्या पार पडावेत यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मुख्य पंच श्री. राज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पंचांनी अत्यंत प्रभावी भूमिका पार पाडली. स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामने 13 जुलै रोजी पार पडले. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरुष व महिला एकेरी प्रकारात उत्कर्ष शीलवंत आणि वेदश्री बंडेवार यांनी आपले विजेतेपद राखले तर पुरुष दुहेरी प्रकारात राहुल तिवाडी व आनंद मुसळे ही अनुभवी जोडी सलग पाचव्यांदा अजिंक्य ठरली. या स्पर्धेत राजवर्धन वळसंगकर, आदित्य सगर, श्रुतिका बोरगांवकर व वेदश्री बंडेवार यांनी वेगवेगळ्या वयोगटांत तीन प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवत ‘तिहेरी मुकूट’ मिळवण्याचा मान मिळवला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धेचे प्रायोजक पु. ना. गाडगीळ अँड सन्स, सोलापूर शाखेचे व्यवस्थापक श्री. हेमंत साई, bosch कंपनीचे श्री. योगी वळसंगे आणि पंढरपूर येथील बॅडमिंटन खेळाडू व ‘नरीश टू बिल्ड’ संस्थेच्या संस्थापिका सौ. शुभदा पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. विजेत्यांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे.
विजेते आणि उपविजेते – सोलापूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा
(१० वर्षांखालील मुली – एकेरी)
विजेते: स्वराली गायकवाड
उपविजेते: सान्वी भालवणकर
(१० वर्षांखालील मुले – एकेरी)
विजेते: अंशुल गांधी
उपविजेते: अर्हम फडे
(१३ वर्षांखालील मुली – एकेरी)
विजेते: श्रुतिका बोरगांवकर
उपविजेते: सृष्टी सगर
(१३ वर्षांखालील मुले – एकेरी)
विजेते: श्रीयांश हुबळीकर
उपविजेते: शिवरुद्र मुळे
(१३ वर्षांखालील मुले – दुहेरी)
विजेते: शिवरुद्र मुळे + शुभंकर मुळे
उपविजेते: अर्णव दोशी + शौर्य बंडगर
(१५ वर्षांखालील मुली – एकेरी)
विजेते: श्रुतिका बोरगांवकर
उपविजेते: सृष्टी सगर
(१५ वर्षांखालील मुले – एकेरी)
विजेते: आदित्य सगर
उपविजेते: शिवरुद्र मुळे
(१५ वर्षांखालील मुली – दुहेरी)
विजेते: सृष्टी सगर + श्रुतिका बोरगांवकर
उपविजेते: निहिरा कुंदर्गी + सिद्धी झिंगाडे
(१५ वर्षांखालील मुले दुहेरी)
विजेते: आदित्य सगर + शर्व बिराजदार
उपविजेते: शिवरुद्र मुळे + श्रीयांश हुबळीकर
(१७ वर्षांखालील मुली – एकेरी)
विजेते: श्रुती यादव
उपविजेते: संतोषी डोल
(१७ वर्षांखालील मुले – एकेरी)
विजेते: आदित्य सगर
उपविजेते: ओंकार हरळेकर
(१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी)
विजेते: आर्यन कटकमवार + मीत बजाज
उपविजेते: आदित्य सगर + ओंकार हरळेकर
(१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी)
विजेते: प्रणीत कवडे + तनिष्का पाटील
उपविजेते: आर्यन कटकमवार + संतोषी डोल
(१९ वर्षांखालील मुली – एकेरी)
विजेते: श्रुती यादव
उपविजेते: श्रेया मिस्किन
(१९ वर्षांखालील मुले – एकेरी)
विजेते: राजवर्धन वळसंगकर
उपविजेते: सार्थक कुलकर्णी
(१९ वर्षांखालील मुले – दुहेरी)
विजेते: राजवर्धन वळसंगकर + सार्थक कुलकर्णी
उपविजेते: मीत बजाज + श्रवण बजाज
(१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी)
विजेते: राजवर्धन वळसंगकर + श्रेया मिस्किन
उपविजेते: नीव मर्दा + निधी मर्दा
(महिला एकेरी – खुला गट)
विजेते: वेदश्री बंडेवार
उपविजेते: श्रेया मिस्किन
(पुरुष एकेरी – खुला गट)
विजेते: उत्कर्ष शीलवंत
उपविजेते: राजवर्धन वळसंगकर
(महिला दुहेरी – खुला गट)
विजेते: नेहल शाह + वेदश्री बंडेवार
उपविजेते: श्रेया मिस्किन + तनिष्का पाटील
(पुरुष दुहेरी – खुला गट)
विजेते: आनंद मुसळे + राहुल तिवाडी
उपविजेते: आदित्य सुपेकर + विजय बडवे
(मिश्र दुहेरी – खुला गट)
विजेते: राहुल तिवाडी + वेदश्री बंडेवार
उपविजेते: आदित्य पिंपळनेरकर + निधी मर्दा
(पुरुष दुहेरी – ४५ वर्षांवरील)
विजेते: जीतेन्द्र राठी + शशांक कुलकर्णी
उपविजेते: मनोज मुलगे + शैलेश मलानी