मार्डी सर्कलमध्ये 112 शैक्षणिक व विविध दाखल्यांचे वाटप

मार्डी (ता. उत्तर सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी सर्कलमध्ये मागील तीन दिवसांपासून शैक्षणिक दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. उत्तर सोलापूर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आयोजित या शिबिरात एकूण 112 दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

या दाखल्यांमध्ये पुढील प्रकारांचा समावेश होता:

  • जात प्रमाणपत्रे – 12
  • उत्पन्न प्रमाणपत्रे – 52
  • डॉमिसाईल (स्थलनिवास) प्रमाणपत्र – 28
  • नॉन-क्रिमिलियर सर्टिफिकेट – 8
  • इतर विविध दाखले – शिल्लक प्रमाणात

मार्डी सर्कल अधिकारी अविनाश गायकवाड यांच्या हस्ते हे दाखले वितरित करण्यात आले. यावेळी उत्तर सोलापूर तहसीलदार, महसूल विभागातील तलाठी दीपक कावळे, गवळी तलाठी, तसेच महा ई सेवा केंद्र चालक नागेश घोडके, पूजा कदम, आणि लहू गवळी उपस्थित होते. महात्मा फुले हायस्कूल, मार्डी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक सुजितकुमार इनामदार, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार, गावपातळीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले सहजपणे मिळावेत, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत आणि सहज मिळू शकली. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तहसीलदार कार्यालयाचे आभार मानले असून, शासनाचे असे प्रकल्प गोरगरिबांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.