सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने यांची हॅटट्रिक; उपसभापतीपदी सुनील कळके
.jpeg)
पंचाक्षरी स्वामी मंद्रूप,दि.११ राज्यातील अग्रगण असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती माजी आमदार दिलीप माने यांचे तिसऱ्यांदा तर उपसभापतीपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विश्वासू समर्थक मुस्तीचे सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.या बैठकीस बाजार समितीचे संचालक राजशेखर शिवदारे अनुपस्थित होते. जिल्ह्यात आणि राज्यात चर्चेला जात असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक सुरेश हसापुरे, श्री स्वामी समर्थ सूतमिलचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने तब्बल १८ पैकी १५ जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. आमदार सुभाष देशमुख माजी मंत्री विजयकुमार देशमुख व सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके, बळीराम साठे, महादेव चाकोते यांच्या पॅनलला ग्रामपंचायत मतदार संघातील तीन जागा मिळाल्या आहेत. सोलापूर बाजार समितीचे सभापती कोणाला करायचं यासंदर्भात आमदार सचिनकल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोट येथील निवासास्थानी बैठकीत आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीत माजी आमदार माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश साखरे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्रथम दोन वर्षासाठी दिलीप माने आणि उपसभापतीपदी सुनील कळके यांची निवड करण्यात यावी अशी सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली. त्यानुसार कल्याणशेटी यांनी सभापतीपदी माने यांची तर उपसभापतीपदी कळके यांची निवड जाहीर केली. या निवडीत आमदार कल्याणशेट्टी यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.माजी आमदार दिलीप माने यापूर्वी १८ ऑक्टोंबर २०११ तसेच १६ जुलै २०१८ ते ९ जून २०१९ या कालावधीमध्ये सभापती होते त्यानंतर त्यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे.तर सुनील कळके यांची पहिल्यांदाच उपसभापती झाले आहेत. यावेळी या निवड सभेस नूतन संचालक सुरेश हसापुरे, इंदुमती अलगोंड-पाटील, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्डंडे,प्रथमेश पाटील, नागण्णा बनसोडे, सुभाष पाटोळे, उदयकुमार पाटील, अनिता विभुते, विरोध पॅनलचे संचालक मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड, वैभव बरबडे, मुश्ताक चौधरी,चांद गफ्फार शेख आदी उपस्थित होते.