फॉरेवर कंपनीत स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांच्या पगारात तफावत; सोलापुरात ५०० कामगारांचं आंदोलन
.jpeg)
सोलापूर : फॉरेवर क्लोथिंग कंपनी (Thomas Scott India Ltd. अंतर्गत) मध्ये
स्थानिक म्हणजेच सोलापूरकर कामगारांना परप्रांतीयांच्या तुलनेत कमी वेतन दिलं जात
असल्याच्या निषेधार्थ सुमारे ५०० कामगारांनी गेटसमोर मोठं आंदोलन केलं. कामगारांच्या
मते, दोघंही समान तास काम करत असतानाही परप्रांतीयांना १७,००० ते १८,००० रुपये पगार दिला जातो, तर स्थानिकांना फक्त १३,००० रुपये मिळतो. ही
वेतनतफावत अन्यायकारक असल्याचं म्हणत कामगारांनी तीव्र निषेध केला. फॅक्टरी
अक्कलकोट एमआयडीसीमध्ये असून कंपनीचं हेड ऑफिस मुंबईत आहे. आंदोलनाच्या ठिकाणी
मोठी गर्दी जमली होती आणि कामगारांनी कंपनीविरोधात घोषणाबाजी केली.