धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँगची क्रूरता औरंगजेबाहून अधिक – करुणा मुंडे यांचा आरोप

मुंबई: धनंजय मुंडे व त्यांची गँग मुघल बादशहा औरंगजेबाहून अधिक क्रूर असल्याचा आरोप करुणा शर्मा मुंडे यांनी केला आहे. कारण औरंगजेबाने स्वतःच्या बायकोला तुरुंगात डांबले नव्हते. आपल्या बायकोला गुंडांकडून मारहाण केली नव्हती. त्याने जखमांवर मीठ चोळले होते. अशा शब्दात करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा तोफ डागली आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयमध्ये धनंजय मुंडे यांनी करूणा या आपल्या पत्नी नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे करुणा यांच्यापासून जन्मलेली मुलं आपली असून त्यांचे पालकत्व आपण स्वीकारल्याचे धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे. करुणा मुंडे यांनी आपल्याला पत्नीचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन संघर्ष करत आहेत. त्यामुळे करुणा यांच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.