धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; कराडच्या खंडणी बैठकीचा धक्कादायक खुलासा

बीड :  माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित खंडणी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे झाले आहेत. आवादा प्रकल्प अधिकाऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितल्यानुसार, खंडणीसाठी मुंडेंच्या कार्यालयात बैठक पार पडली होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्या धनंजय मुंडेंशी घनिष्ठ संबंधांमुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र, नव्या खुलाशांमुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आवादा प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबानुसार:

  • ऑगस्ट: वाल्मिक कराडने खंडणीची पहिली मागणी केली आणि परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा, अशी धमकी दिली.
  • ११ सप्टेंबर: कराडने पुन्हा फोनवर धमकी दिली आणि जिल्ह्यातील कामांची माहिती असल्याचे सांगितले.
  • ऑक्टोबर: धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात खंडणीसाठी बैठक पार पडली, जिथे प्लांट सुरु ठेवायचा असेल तर २ कोटी रुपये द्या अशी मागणी झाली.
  • २६ नोव्हेंबर: सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात घुसून धमकी दिली.
  • २९ नोव्हेंबर: कराडने पाचव्यांदा फोनवरुन खंडणीची मागणी करत काम बंद करण्याची धमकी दिली.
  • ६ डिसेंबर: सुदर्शन घुलेने कंपनीत घुसून सुरक्षारक्षकाला मारहाण करत २ कोटी रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास जीवघेणा इशारा दिला.

पोलिस तपासातून समोर आलेल्या या धक्कादायक खुलास्यांमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.