धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ? परळी न्यायालयात आज सुनावणी

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. २०२४ विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांनी करुणा मुंडे यांच्याविषयीची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करत न्यायालयात मूळ कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा उल्लेख केल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र, त्यांनी आपल्या पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुलींसह करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख शपथपत्रात केला आहे. शपथपत्रातील विसंगतीमुळे आमदारकी धोक्यात? धनंजय मुंडेंच्या शपथपत्रातील विसंगतीमुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज होणाऱ्या परळी न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान मुंडे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करुणा मुंडेंच्या पोटगी प्रकरणावरही सुनावणी सुरू मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना धनंजय मुंडेंनी दरमहा दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. राजकीय आणि कायदेशीर संकट धनंजय मुंडे यांच्यावरील हे प्रकरण त्यांच्यासाठी राजकीय आणि वैयक्तिक संकट वाढवणारे ठरू शकते. परळी न्यायालयाचा निर्णय आणि त्यांच्या आमदारकीवर होणाऱ्या परिणामाबाबत राज्यभरातून उत्सुकता आहे.