आषाढी वारीत भाविकांनी अर्पण केलं तब्बल ₹10.84 कोटींचं दान!
.jpeg)
पंढरपूर | १७ जुलै २०२५ –
यंदाच्या आषाढी वारीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला तब्बल १० कोटी 84 लाख 8 हजार 531 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून, हे मागील वर्षाच्या तुलनेत २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ रुपयांनी अधिक आहे. ही माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.२६ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत लाखो
भाविकांनी श्रींच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. देणगी, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास, हुंडीपेटी, सोनं-चांदी, अगरबत्ती, चंदन, महावस्त्रे, मोबाइल लॉकर यांसारख्या माध्यमांतून हे उत्पन्न
मिळाले.
या वर्षी प्राप्त झालेलं उत्पन्न (२०२५):
- श्रींच्या चरणाजवळ अर्पण: ₹75,05,291
- देणगी: ₹2,88,33,569
- लाडू प्रसाद विक्री: ₹94,04,340
- भक्तनिवास: ₹45,41,458
- हुंडीपेटी: ₹1,44,71,348
- परिवार देवता अर्पण: ₹32,45,682
- सोनं-चांदी, चंदन, अगरबत्ती इत्यादी: ₹2,59,61,768
- इतर उत्पन्न: ₹12,45,075
- इलेक्ट्रिक रिक्षा/बस उत्पन्न: ₹32,00,000
मागील वर्षीचे उत्पन्न (२०२४):
- एकूण उत्पन्न: ₹8,48,58,560
- सर्व श्रेणींमधून उत्पन्न कमी
वाढलेली रक्कम:
₹2,35,49,971 इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे.
प्रशासनाची भूमिका:
मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले की, मिळालेल्या या दानातून भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा
प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, दर्शन व्यवस्था, स्वच्छता आणि निवास याकडे विशेष लक्ष देण्यात
येणार आहे.