देवेंद्र कोठे हे शहर विकासाचा व्यापक विचार करणारे आमदार

सोलापूर : प्रतिनिधी आमदार
देवेंद्र कोठे यांचा विकासकामांसाठीचा पाठपुरावा आणि कामाचा झपाटा अफाट आहे. आमदार
झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात शहर विकासाचा व्यापक विचार आणि कृती करणारे आमदार
देवेंद्र कोठे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील १४ कोटी रुपयांच्या निधी
अंतर्गत रस्त्यांसह विविध विकासकामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे
यांच्या हस्ते कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन पार्क मैदानावर करण्यात आला. यावेळी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यपद्धतीवर
प्रभावित होऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, माजी
आमदार राजेंद्र राऊत, भाजपाचे
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपाचे
राज्य परिषद सदस्य विक्रम देशमुख, अविनाश
महागावकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, माजी
महापौर श्रीकांचना यन्नम, माजी
उपमहापौर दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, भाजपा महिला शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली, भूपती कमटम, अंबादास
बिंगी, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक
कोंड्याल, स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक रवी कैय्यावाले, राजकुमार हंचाटे, जेम्स
जंगम, अंबादास करगुळे, भाजपाचे
मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय
अंजिखाने, नागेश खरात आदी उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरवर आणि आमदार
देवेंद्र कोठे यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी
दिलेल्या विकासकामाच्या प्रत्येक प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्काळ
मंजुरी देतात. आमदार देवेंद्र कोठे यांना विकासकामाबद्दल अत्यंत आत्मीयता आहे.
हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा मोठा विचार करून ते राजकारणात आले आहेत. समांतर
जलवाहिनीच्या कामाची पूर्तता, विमानसेवेचा
प्रारंभ, सोलापूर मुंबई विमान सेवेचा पाठपुरावा, शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेसाठीचा निधी आदी
विषयात त्यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका
निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन कमळ चिन्हावर आलेला महापौर निवडून
देण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी
केले. शहरातील
उड्डाणपूल, झोपडपट्टीतील
नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि आमदार
देवेंद्र कोठे आग्रही आहेत. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता
पार्टीने सोपवलेली जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी येथून जाणार नाही, असे आश्वासनही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी
दिले. आमदार
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, आमदार
देवेंद्र कोठे हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
लाडके आमदार आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा
कायापालट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शहराचे
आजवर नेतृत्व केले, त्यांचा
विक्रम आमदार देवेंद्र कोठे निश्चितपणे मोडतील असा विश्वास आहे, असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी म्हणाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या
हिबारे यांनी सूत्रसंचालन तर माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी आभार प्रदर्शन
केले. या
विकासकामांचा झाला शुभारंभ १४ कोटी
रुपयांच्या अंतर्गत रस्ते विकासकामांचा शुभारंभ, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित शालेय विद्यार्थ्यांना ५५ हजार ५५५ वह्या
वाटपाचा शुभारंभ, सोलापूर
महानगरपालिकेच्या ६ आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन, अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतन लगत अर्बन मल्टी स्ट्रीट
पार्कचे उद्घाटन यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री, मी आणि
संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी भाजपा हा
काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. जिथे आहोत तिथे प्रामाणिकपणे
राहणे आणि सेवा करणे हा देवेंद्र कोठे यांचा विशेष गुण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस मी आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी कायम उभी
आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या
वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्च करू नये असे आवाहन केले होते.
त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेला शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता सहाय्यभूत
करणारा ५५ हजार ५५५ वह्या वाटपाचा कार्यक्रम आणि विकासकामांचे उद्घाटन केले. -- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य यांचा
झाला भाजप प्रवेश या
कार्यक्रमात माजी नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, माजी
नगरसेविका सारिका सुरवसे, सतीश
सुरवसे, शिवराम प्रतिष्ठानचे श्रीकांत वाडेकर, रुपेश जक्कल, रतिकांत
कमलापुरे, कांताताई बनसोडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
त्यांना पक्षाचे उपरणे परिधान करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात प्रवेश
दिला.