देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार - परस्परविरोधी राजकीय प्रवासासह वाढदिवसाचे जुळे भाऊ

मुंबई | 22 जुलै 2025: महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन परस्परविरोधी वाटचाल करणारे, पण तितकेच प्रभावी नेते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारयांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. वेगवेगळ्या कार्यशैली, राजकीय पार्श्वभूमी आणि जनमानसावर असलेला प्रभाव यामुळे हे दोघेही कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. ऐतिहासिक साम्य – पहाटेचा शपथविधी 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठे नाट्य घडले. पहाटेच्या शपथविधीत या दोघांनी एकत्र सरकार स्थापनेचा प्रयत्न केला होता. ही घटना आजही चर्चेचा विषय असते. फडणवीस मुख्यमंत्रिपदी आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी अवघ्या 82 तासांसाठी सत्तेत होते. नंतर पुन्हा 2022 मध्ये अजित पवार महायुतीत सामील झाले आणि सध्या दोघे पुन्हा एकत्र आहेत. ग्रामीण विरुद्ध शहरी नेतृत्व अजित पवारबारामतीतील ग्रामीण राजकारणात रुजलेले, रांगडा अंदाज, सरळ भाषाशैली देवेंद्र फडणवीसनागपूरच्या शहरी वातावरणात घडलेले, संयत बोलणं, सखोल अभ्यास आणि रणनीतीचा मास्टरप्लॅनर

रणनीतीतील पारंगत

  • अजित पवार – वेळेचं काटेकोर पालन, शब्द पाळण्याबाबत प्रसिद्ध
  • फडणवीस – विरोधकांनाही चकवणारी चाणक्य नीती

अढळ स्थान

अजित पवारग्रामीण विकास, सहकार क्षेत्र
देवेंद्र फडणवीसशहरी पायाभूत सुविधा, प्रशासनातील सुधारणा वाढदिवसाचा क्षण आज दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे –
मी पुन्हा येईन’ भारी का ‘पहाटेचा गेम’?’
उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनेच द्यायचं आहे.