तापमानाने हैराण दिल्लीकरांना पावसामुळे दिलासा ....

नवीदिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे  तापमानात घट नोंदविली आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दिल्लीत आज दिवसभर मध्यम पावसासह ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली व्यतिरिक्त उत्तर भारतातील बर्‍याच भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमध्ये बर्फामुळे थंडी वाढली आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात हिमस्खलन झाले, ज्यात काही लोक अडकले आहेत, तर काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले  आहे. त्याचवेळी, हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये सतत पावसामुळे भूस्खलन होत आहे, ज्यामुळे बरेच रस्तेही खचले आहेत. याशिवाय प्रशासनाने नद्या व नाल्यांच्या आसपास राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.