पत्रकार संघाच्या वार्षिक सभेत दीपक शिंत्रे यांचा सत्कार

विजयपूर : शहरातील कंदगल हनमंतराय
रंगमंदिरात विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे
आयोजन करण्यात आले. या वेळी संघाचे सहखजिनदार आणि ज्येष्ठ पत्रकार दीपक शिंत्रे
यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी माध्यम अकादमी पुरस्कार प्राप्त
सुशीलेंद्र नायक, महेश शटगार, केयूडीब्ल्यूजे
पुरस्कार विजेते शशिकांत मेंडेगार, अल्लमप्रभू
मल्लिकार्जुनमठ आणि राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे सिंडिकेट सदस्य म्हणून नियुक्त
रफी भंडारी यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच कार्यरत संपादक संघाचे नवीन
जिल्हा अध्यक्ष इरफान शेख यांना अभिनंदनपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर:
संघाचे मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, सचिव अविनाश बिदरी, राज्य
कार्यकारी नामनिर्देशित सदस्य के.के. कुलकर्णी, राज्य
समितीचे विशेष आमंत्रित सदस्य कौशल्य पन्हाळकर, खजिनदार
राहुल आपटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बाबुराव
कुलकर्णी यांच्या प्रार्थनागीताने झाली. संघाचे उपाध्यक्ष इंदुशेखर मणूर यांनी
स्वागत केले, तर डि.बी. वडवडगी यांनी संघाच्या तीन
वर्षांच्या कार्यप्रगतीचा अहवाल वाचला आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी
बसवराज उळ्लागड्डी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी पत्रकार संघाच्या सर्व
सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. विजयपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुका
घटक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.