लॉस एंजेलिसमधील अग्नी तांडवातील मृतांची संख्या १६ वर
.jpeg)
लॉस एंजेलिस: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस
एंजेलिसमधील ६ जंगलांमध्ये लागलेली आग अद्याप धुमसतच आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस
एंजेलिसमधील ६ जंगलांमध्ये लागलेली आग अद्याप धुमसतच आहे. या अग्नी तांडवातील मृतांची संखृया १६ झाली
आहे, असे वृत 'एपी'ने दिली आहे.
यातील बहुतांश मृतांची संख्या अद्याप पटलेलीही नाही. याशिवाय आगीत १२,००० हून अधिक इमारती, शेकडो वाहने आणि मालमत्ता नष्ट
झाल्या आहेत. दरम्यान, १३ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा
शोध घेणे हे अग्निशमन विभागासाठी मोठे आव्हान आहे. ३९,०००
एकर क्षेत्राची राखरांगोळी, १२,००० हून
अधिक घरे उद्ध्वस्त मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉस एंजेलिसमधील
६ जंगलांमध्ये लागलेली आग तब्बल ५० हजार एकरवर पसरली आहे. यातील ३९,००० एकर क्षेत्राची राखरांगोळी. १२,००० हून अधिक घरे
उद्ध्वस्त झाली आहेत. अग्निशमन अधिकारी टॉड हॉपकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पॅलिसेड्स आगीत २२,००० एकरहून अधिक जमीन जळून
खाक झाली आहे. ४२६ घरांसह ५,००० हून अधिक इमारती उद्ध्वस्त
झाल्या. हॉलिवूड हिल्समध्ये कोट्यवधी रुपयांची अनेक घरे जळून खाक झाली आहेत.
जोरदार वार्यांमुळे आग पसरली अमेरिकेच्या हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील आठवड्यात आणखी जोरात वारे वाहू शकतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अग्निशमन प्रमुख अँथनी मॅरोन यांनी माध्यमांना सांगितले की, सांता आना येथे जोरदार वाऱ्यांमुळे आग वाढली. वाऱ्याचा वेग १०० मैल प्रतितास आहे. ही आग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या आग मँडेव्हिल कॅन्यन परिसरापर्यंत पोहोचली आहे. सॅन फर्नांडो व्हॅली आणि ब्रेंटवुड देखील धोक्यात आहेत. ३.१९ लाख लोकांना घरे सोडण्याचे आदेश ही आग आता लॉस एंजेलिसच्या मँडेव्हिल कॅन्यन परिसरापर्यंत पोहोचली आहे. आता ती सॅन फर्नांडो व्हॅली आणि ब्रेंटवुडमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या भागात अनेक सेलिब्रिटी राहतात. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचेही घर आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी म्हटलं आहे, आगीचा धोका लक्षात घेता ३.१९ लाख लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १.५३ लाख नागरिकांना घरे सक्तीने रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. १.६६ लाख लोकांना त्यांची घरे अंशतः रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. आगीमुळे अजूनही ५७,००० हून अधिक इमारती धोक्यात आहेत. सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे नुकसान? सरकारने अद्याप नुकसानीचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत, परंतु खाजगी कंपन्यांचा अंदाज आहे की आगीमुळे १७० अब्ज डॉलर्स (सुमारे १६ लाख कोटी रुपये) चे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीचे प्रमुख कारण म्हणजे कोट्यवधी किमतीची घरे. आगीत अडकले. घरे जाळल्यामुळे, मदत छावण्यांमध्ये जागा नसल्याने शेकडो लोकांना आता रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे. ५०,००० घरांमध्ये अंधार, शाळा बंद आगीमुळे राज्यातील ५०,००० घरे आणि व्यवसाय अजूनही वीजेशिवाय आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यात तिसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी मदत कार्याच्या स्थितीबद्दल चर्चा केली. गव्हर्नर न्यूसम म्हणाले की, १४,००० हून अधिक अग्निशमन विभागाचे कर्मचारी, कॉल गार्डचे १,६८० सदस्य, १,६६८ अग्निशमन इंजिन आणि ७१ हेलिकॉप्टर आग विझवण्यात गुंतले होते. सर्वात मोठ्या लॉटरी विजेत्याचा बंगला आगीत भस्मसात एडविन कॅस्ट्रो यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये २.०४ अब्ज डॉलर्स (१६,५९० कोटी रुपये) चे जगातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस जिंकलं होतं. या पैशातून त्यांनी हॉलिवूड हिल्सवरील एका आलिशान बंगला तब्बल र २५.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून विकत घेतला होता. आपण अब्जाधीश होवू असे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं;पण न पाहिलेलं स्वप्न वास्तवात उतरलं... एका क्षणात तो अब्जाधीश झाला... तब्बल २.०४ अब्ज डॉलर्स (१६,५९० कोटी रुपये)चे जगातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस त्याने जिंकलं. त्याचे सारं आयुष्यच बदललं. त्याने तब्बल २५.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून आपला स्वप्नातील बंगलाही खरेदी गेला. अवघ्या काही महिन्यात नियतीने फासे पलटले. नशीबाने दिलेला बंगला लॉस एंजेलिसमधील आगीत भस्मसात झाला. या संदर्भातील वृत्त 'द न्यू यॉर्क पोस्ट'ने दिले आहे.
कॅलिफोर्नियातील एडविन कॅस्ट्रो यांनी फेब्रुवारी २०२४
मध्ये २.०४ अब्ज डॉलर्स (१६,५९० कोटी रुपये) चे जगातील सर्वात मोठे
लॉटरी बक्षीस जिंकलं होतं. या पैशातून त्यांनी हॉलिवूड हिल्सवरील एका आलिशान
बंगला तब्बल र २५.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून विकत घेतला होता. कॅस्ट्रो यांचे
कोट्यवधी डॉलर्सचा बंगाल आगीत भस्मसात झाला आहे. आता येथे केवळराखेचे ढिगारे उरले
आहेत. बंगलात केवळ काँक्रीटचे खांब आणि धुमसणारे लाकूड शिल्लक राहिले आहेत. लॉस
एंजलिसमध्ये लागलेल्या आगीत गायिका एरियाना ग्रांडे, अभिनेता
डकोटा जॉन्सन आणि जिमी किमेल यांच्यासह प्रमुख सेलिब्रिटींची बंगल्यांचीही
राखरांगोळी झाली आहे.