अप्पासाहेब काडादी पुण्यतिथी; उद्या विवेक सावंत यांचे व्याख्यान
.jpeg)
सोलापूर
: येथील श्री
सिध्देश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे दिवंगत आधारस्तंभ म.बं. तथा कर्मयोगी अप्पासाहेब
काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या गुरुवार 27 फेबु्रवारी रोजी श्री सिध्देश्वर
देवस्थान शिक्षण संकुल व श्री संगमेश्वर शिक्षण संकुल संचलित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी
प्रबोधन मंचच्यावतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तंत्रज्ञ तथा व्याख्याते विवेक सावंत
यांचे व्याख्यान होणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल)
मुख्य मार्गदर्शक असलेले विवेक सावंत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण’ या विषयावर
मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान सात रस्ता येथील संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ शिक्षण संकुलातील
सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह सोलापुरातील जिज्ञासू नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी
घ्यावा, असे आवाहन श्री सिध्देश्वर देवस्थान शिक्षण संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे.