दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर पुरस्काराचे सागर सुरवसे, आफताब शेख व श्रीमती मनिषा जाधव ठरले मानकरी

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या दे.भ. गांधीवादी स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृष्ण भीमराव अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यावर्षी टी.व्ही.९ मराठी ब्युरोचे चीफ सागर सुरवसे यांना 'गझनफर' कार हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार, ए.बी.पी.माझा वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आफताब अन्वर शेख यांना दे. भ. 'कर्मयोगी' कार रामभाऊ राजवाडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार तसेच श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव (आरोग्य सेविका) यांना स्वातंत्र्यसेनानी दे. भ. डॉ. अंत्रोळीकर स्मृती आदर्श समाजसेविका पुरस्कार देण्यात येणार आहे. ५००० रु. रोख, स्मृती चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार सुप्रसिध्द व ज्येष्ठ राजकीय विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते दिले जाणार असून यावेळी त्यांचे 'महाराष्ट्राचे बदलते राजकारण' याविषयावर व्याख्यान होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे हे भूषविणार आहेत. हा समारंभ गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आला असून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर व सचिव मोहन अंत्रोळीकर यांनी केले आहे