रामणबाग ढोल पथकात सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता हीच
खरी सुरक्षा आहे, या ध्येयाने रामणबाग ढोल पथक यांच्या
सहकार्याने सर परशुरामभाऊ महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त
विद्यमाने नारायण पेठ, रामणबाग शाळा मैदान, पुणे–411030 येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे
आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी चिन्मय
शेवडे व श्रेयस गोरे (सायबर वॉरियर्स) यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या
मार्गदर्शनातून उपस्थितांना दैनंदिन जीवनात वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या
विविध प्रकारांबद्दल माहिती मिळाली. कार्यक्रमादरम्यान फसवे क्लिक, ओटीपी फसवणूक, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल्स,
पासवर्ड सुरक्षितता व टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन यांसारख्या महत्त्वाच्या
विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः मुलांना व नागरिकांना ऑनलाईन
सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक टिप्स व उपाय योजनांवर भर देण्यात आला. या जनजागृती
उपक्रमाला ढोल पथक वादकांसह स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सायबर
सुरक्षेबाबत जनजागृती वाढीस लागल्याने समाजात सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण
करण्यासाठी या उपक्रमाची निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत
सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.