हाय व्होल्टेज अपहरण नाट्यावर पडदा; माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप घरी
.jpeg)
पुणे: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हाय व्होल्टेज अपहरण नाट्यावर पडदा पडला असून माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज उर्फ ऋषिकेश हा सुखरूप घरी परतला आहे. ऋषिराज सावंतला बॅकॉक कडे घेऊन जाणारे विमान पोलिसांनी तातडीने परत बोलवल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत तत्परतेने ही कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
---
कुटुंबीयांशी वाद झाल्याने......
दरम्यान, एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषीराज सावंत हे कौटुंबिक वादानंतर दुपारी 4.15 च्या सुमारास घरातून निघून गेल्याचा दावा केला जात आहे. या वृत्तानुसार, ऋषिकेश सावंत यांचा आज आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला. त्यानंतर ते चार्टर फ्लाईटने बँकॉकला निघून गेले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बँकॉकला जाणारे हे चार्टर विमान भारताच्या हद्दीत असेल तर त्याला भारतातच उतरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही माहिती आहे. तूर्त सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
____
ऋषिकेश ला भेटल्यानंतरच वास्तव कळेल; माजी मंत्री तानाजी सावंत
ऋषिकेश सावंत यांच्या कठीत अपहरण प्रकरणी बोलताना माजी मंत्री तानाजी सावंत यांनी ऋषिकेश ला प्रत्यक्ष भेटल्यानंतरच नक्की काय घडले याची माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तानाजी सावंत म्हणाले, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमकं माहित नाही. त्याच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला.
तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. फोन केल्याशिवाय तो कुठे जात नाही, मात्र आज तसे झाले नाही म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच याबद्दल मला माहिती आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला.या प्रकरणावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले, पहाटे उठून त्याने अभिषेक देखील केला होता. त्यानंतर तो सकाळी आवरून कॅम्पससाठी निघाला होता. पण त्याची हे अचानक टूर ठरली याबद्दल मला माहीत नव्हते. तो नेमका कशासाठी गेला होता हे भेटल्यानंतर कळेल.असेही डॉ.सावंत यांनी सांगितले.
---
पोलिसांनी विमान अर्ध्या रस्त्यावरून परत बोलवले
पोलिसांनी यावर बोलताना सांगितले की आम्हाला तक्रार अशाच प्रकारची मिळाली होती की ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाले आहे, ते बेपत्ता झाले आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही तपास चालू केला होता. मात्र, पुढील चौकशीमध्ये ते बँकॉकला निघाले असल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार मग आम्ही वैमानिकाला संपर्क साधून अर्ध्या रस्त्यातूनच ते विमान पुन्हा पुण्यामध्ये बोलावण्यात आले.
---
राज्यात खळबळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झालेत. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम ऍक्टिव्हे
ट झाली आहे.