संतोष देशमुख हत्या प्रकरण: काँग्रेसची मस्साजोग ते बीड ५१ किमी सद्भावना पदयात्रा

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसने मस्साजोग ते बीड ५१ किलोमीटरची सद्भावना पदयात्रा काढली आहे. नव्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात भाग घेतला.

 संतोष देशमुख हत्या प्रकरण – विरोधाचा सूर तीव्र

 संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती.
 हत्या प्रकरणातील क्रूर फोटो समोर आल्यानंतर आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रकरणानंतर तब्बल ८४ दिवसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्यात आला. मात्र काँग्रेससह अनेक कार्यकर्ते अजूनही देशमुख कुटुंबीयांसोबत उभे राहून न्यायाची मागणी करत आहेत.

सद्भावना पदयात्रेचा उद्देश

मस्साजोग ते बीड ५१ किलोमीटरची यात्रा काँग्रेसने आयोजित केली आहे. यात्रेचा मार्ग – मस्साजोग, नेकनूर (मुक्काम), बीड रॅलीच्या शेवटी बीडमध्ये सद्भावना सभा घेण्यात येणार आहे. या यात्रेत राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांची परखड भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग येथे पोहोचून देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. ही लढाई देशमुख कुटुंबीयांची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. देशमुख कुटुंबीयांनी इतक्या मोठ्या आघातानंतरही संयम दाखवला आहे. त्यांनी कधीही जाती-धर्माचा विषय पुढे आणला नाही, याचे समाजाने कौतुक करावे,” असे ते म्हणाले. ही सद्भावना यात्रा संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठीही महत्त्वाची मानली जात आहे.