सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

सोलापूर: सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांची बदली झाली आहे.  तेली यांच्या ठिकाणी धाराशिवचे ज़िल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची वर्णी लागली आहे. 

धाराशिवचे ज़िल्हाधिकारी होण्यापूर्वी डॉ. सचिन ओंबासे यांनी वर्धा ज़िल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे. पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेज मधून डॉ. ओंबासे यांनी mbbs शिक्षण पूर्ण केलं असून  २०१५ बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. डॉ. ओंबासे यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी झालेली बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केल्याचे मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे. 

धाराशिवाचे जिल्हाधिकारी हे कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवी चरणी मागील वीस वर्षांत भाविकांनी अर्पण केलेल्या सोने आणि चांदी वितळविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची मोठी चर्चा झाली. या निर्णय विरोधात पुजारी मंडळाने आक्षेप घेत छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती न्यायालयाने सोने-चांदी विताळविण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी डॉ.ओंबासे राज्यात चर्चेत आले होते.